घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, तपासासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून  SIT ची स्थापना
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, तपासासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SIT ची स्थापना
img
Dipali Ghadwaje
मुंबई : अनधिकृत होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्यामुळे मुंबईत झालेल्या अपघातानंतर संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती होती. मृतांचा आकडा वाढला असून होर्डिंग दुर्घटनेतील मृतांची संख्या 17 वर पोहोचली आहे.  दरम्यान या दुर्घटनेच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये सहा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यामध्ये गुन्हे शाखेच्या कक्ष सहाचे प्रभारी निरीक्षक महेश तावडे या पथकाचे नेतृत्व करणार आहेत. पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत. ज्या कंपनीने हे होर्डिंग लावले होते त्याचा मालक भावेश भिंडे याच्या कार्यालयातून कागदपत्रं जप्त करण्यात आली असून त्यानुसार तपास केला जात असल्याची माहिती आहे. 

 


 
इतर बातम्या
Join Whatsapp Group