ड्रग माफिया ललित पाटीलला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ड्रग माफिया ललित पाटीलला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
img
दैनिक भ्रमर


नाशिक :- ससून हॉस्पिटलमधून २ ऑक्टोबरला रात्री पोलीस बंदोबस्तातून ललित पाटील पसार झाल्यानंतर राज्यात त्याची खूप चर्चा झाली मुंबई पोलीस त्याला शोधण्यासाठी दिवस रात्र एक करत होते.

 संपूर्ण राज्यात ड्रग प्रकरणात खळबळ माजवणाऱ्या ललित पाटीलच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ‘एमडी’ सारख्या घातक ड्रग्जचा व्यापार करणाऱ्या व पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला ललित पाटील अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याला चेन्नई तुन मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते.

 मुंबईतील साकीनाका पोलिसांनी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतून तब्बल २६७ कोटींचे एमडी ड्रग्ज हस्तगत केले तर त्यानंतर नाशिकरोड पोलिसांनी दुसऱ्या गोदामावर छापा टाकून सहा कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते.

दरम्यान, पुणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातून ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील व साथीदार अभिषेक बलकवडे यांना ताब्यात घेतले. मात्र ललित पाटील फरारच होता. ललित पाटीलला पुण्यात आणलं जाणार असून त्यानंतर कोर्टात सादर केलं जाईल. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group