नाशिकरोड(प्रतिनिधी):- बहुचर्चित ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी नाशिकरोड येथे तपास कामी आज सकाळी लवकर आणले होते. मात्र उपनगर येथील घरी घेऊन जाणे पोलिसांनी टाळले.
पान टपरी, छोटे गुन्हे, त्यात राजकीय प्रवास करुन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलिसांच्या मदतीने ड्रग्जचा व्यवसाय करुन तरुण पिढीला बरबाद करण्याचे काम करणारा ड्रग्ज माफिया ललित पाटील, भाऊ भूषण पाटील ही नावे जगभरात पोहचली. मात्र मुबंई पोलिसांनी ललित पाटील चे कारनामे उघड करून ललित पाटील सह जवळपास दोन डझन च्यावर सशयितांना ताब्यात घेतले.
रुग्णालयातुन ललित पळून गेल्यावर त्याला सोळा दिवसांनी मुबंई पोलिसांनी शिताफिने ताब्यात घेऊन त्याला पळून जाण्यात मदत करणाऱ्या दोन मैत्रिणींना ताब्यात घेतले. त्यात एक वकील महिलेचा समावेश आहे.
गुन्ह्यात अटक केल्यानंतर ललित पाटीलला मुबंई पोलीस नाशिकरोडला आणतील, असा कयास असताना व ललितची पोलीस कोठडी उद्या सोमवारी संपत असतांना मुबंई पोलिसांनी लाल रंगाच्या महिंद्रा स्कॉर्पिओ क्रमांक MH 03 D6784 या कर ने त्याला आज सकाळी सात वाजेच्या सुमारास शिंदेगाव येथील त्याच्या ड्रग्ज चा कारखाना येथे घेऊन गेले होते.
त्या ठिकाणी नेऊन ललित पाटीलची मुबंई पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यानंतर त्याला उपनगर येथील त्याच्या घरी घेऊन जातील, असे वाटले असताना पोलिसांनी नऊ वाजेच्या सुमारास शिंदेगाव येथून नाशिकरोड, द्वारका मार्गे मुबंई कडे घेऊन गेले. याबाबत मुबंई पोलिसांनी मोठी गुप्तता पाळली होती.
याबाबत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यांनी सांगितले की, ललित पाटील ला शिंदे गाव येथे मुबंई पोलिसांनी आणले होते, या बाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. नाशिकरोड पोलिसांच्या हद्दीत शिंदेगाव असल्याने मुबंई पोलिसांनी ललित पाटील ला घेऊन येतो मदत द्या ,असे नाशिकरोड पोलिसांना कळवले नाही याबाबत माहिती नाही.
ललित सह मुबंई पोलीस काल पासून नाशकात असण्याची शक्यता आहे. काल मुबंई पोलिसांनी शिंदेगावात फेरफटका मारल्याचे समजते.