'सहा ठिकाणी बॉम्ब ठेवले'; मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज, पोलीस अलर्टवर
'सहा ठिकाणी बॉम्ब ठेवले'; मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज, पोलीस अलर्टवर
img
Dipali Ghadwaje
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना धमकीचे अनेक फोन येत आहेत. अशातत आता मुंबईत 6 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा धमकीचा मेसेज वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला आला आहे. या मेसेजमुळे एकच खळबळ उडाली आहे. हा मेसेज मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून हा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची चौकशी सुरू आहे

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने हेल्पलाइन क्रमांकाच्या व्हॉट्सॲप नंबरवर एक मेसेज पाठवला. मुंबईत 6 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले असून मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकीही त्याने दिली. या मेसेजनंतर मुंबई पोलिसांसह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आणि मेसेज पाठवणाऱ्या त्या व्यक्तीचा शोध सुरू केला.


तसेच वाहतूक पोलिसांनी शहर पोलिस आणि गुन्हे शाखा एटीएसलाही माहिती दिली. काही संशयास्पद ठिकाणांचीही झडती घेण्यात आली मात्र त्यामध्ये काहीच सापडले नाही. यानंतर रात्री उशिरा जॉइंट सीपींनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. शहर पोलिसांसह गुन्हे शाखाही या प्रकरणाचा तपास करत आहे.

यापूर्वीही वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल आणि मेसेजद्वारे धमक्या आल्या आहेत. मात्र त्यामध्ये काहीच तथ्य आढळले नव्हते. आता पुन्हा असाच मेसेज आल्याने खळबळ माजली. धमकीचा तो मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा कसून शोध घेण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group