लग्नाचं आमिष दाखवणारी बबली पोलिसांच्या ताब्यात;  बबलीचा
लग्नाचं आमिष दाखवणारी बबली पोलिसांच्या ताब्यात; बबलीचा "कारनामा" ऐकून तुम्ही व्हाल थक्क
img
Jayshri Rajesh
आपल्या जवळच्या व्यक्तींनीच आपला घात केल्याची प्रकरणं काही कमी नाहीत. मुंबईतून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुरुषाचा आवाज काढून एका महीलेने आपल्याच सोसायटी मधे राहणाऱ्या एका महिलेची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नोकरी आणि लग्नाचं आमिष दाखवून त्या महिलेने शेजारणीची 6 लाख रुपयांची फसवणूक केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपी महिला आधीच विवाहीत असून या फसवणूकीत तिच्या पतीनेही तिची साथ दिल्याचे उघडकीस आले. 

मिरा रोडच्या एका पॉश सोसायटीत ही खळबळजनक घडला असून काशिगांव पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्या महिलेला अटक केली आहे. 43 लाखांचं वर्षाचं पॅकेज असणारी नोकरी देऊ अस आमिष दाखवून, पुरुषाचा आवाज काढून, सहा लाखांची फसवणूक करणाऱ्या मिरा रोडच्या बंटी-बबलीवर काशिगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणातील आरोपी महिलेचा पती अजनही फरार आहे. तर महिला आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ॲनी धैर्यमनी असे पीडितेचे नाव आहे तर रश्मी सजलकर असे आरोपी महिलेचे नाव आहे.

नेमकं घडलं काय ?

मिरा रोडच्या काशिगाव येथील अपना घर फेज ३ येथील उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या तक्रारदार ॲनी धैर्यमनी हिची तिच्याच सोसायटीत राहणाऱ्या रश्मी सजलकर आणि तिचा पती सजलकर हिच्याबरोबर ओळख झाली. ॲनी ही नोकरीच्या शोधात असल्याचे त्यांना समजले आणि त्यांनी त्यांच जाळ फेकलं. एका मोठ्या कंपनीत 43 लाखाच पॅकेज असणारी नोकरी देतो असं सांगून, रश्मीने तिची ओळख अभिमन्यू मेहरा याच्याशी फोनवरून करून दिली. मात्र तो कोणी खरा पुरूष नव्हता तर आरोपी रश्मी हीच पुरूषाचा आवाज काढून. अभिमन्यू बनून ॲनी हिच्याशी बोलू लागली. तिने तिचा विश्वास संपादन केलाआणि तिला नोकरी लावण्याचं आश्वासन दिलं, एवढंच नव्हे तर तिच्याशी लग्न करण्याचेही आश्वासन त्याने ॲनीला दिलं. आणि गोड बोलून विविध कारणांनी तिच्याकडून 6 लाख 60 हजार रुपये उकळले. नोव्हेंबर 2022 पासून हा प्रकार सुरु होता. 

आरोपी रश्मी ही पुरुषाचा आवाज काढून अभिमन्यू नावाने आपली फसवणूक करीत असल्याच ॲनीला समजलं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. अखेर तिने 26 जून रोजी काशिगाव पोलीस ठाण्यात रश्मी आणि तिचा पती याच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी रश्मीला पोलिसांनी अटक केली आहे. तर रश्मीचा पती हा फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group