डॉ. राठी यांच्यावर
डॉ. राठी यांच्यावर "या" कारणातून झाला जीवघेणा हल्ला
img
दैनिक भ्रमर
नाशिक (प्रतिनिधी) :- पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर हॉस्पिटलच्याच माजी पीआरओच्या पतीने आर्थिक वादातून जीवघेणा हल्ला केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. राजेंद्र चंद्रकांत मोरे असे हल्लेखोराचे नाव असून, त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.


याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी, की डॉ. राठी यांच्याकडे रोहिणी राजेंद्र मोरे या पीआरओ म्हणून काम करीत होत्या. सन 2022 मध्ये डॉ. राठी यांची रोहिणी यांचे पती राजेंद्र मोरे यांच्यासमवेत ओळख झाली. काही काळानंतर त्यांनी मोरे यांच्या माध्यमातून म्हसरूळ परिसरात एका जमिनीचा व्यवहार केला होता.

गत दीड वर्षात डॉ. राठी यांनी मोरेला अनेक वेळा व्यवहारापोटी पैसे दिले होते. या पैशांसाठी राठी यांनी त्याच्याकडे तगादा लावला होता.

दरम्यान, राठी यांनी रोहिणी मोरे यांना कामावरून काढून टाकले होते. डॉक्टर आपली बाहेर बदनामी करीत आहेत, असा संशय आल्याने राजेंद्र मोरे याच्या मनात डॉक्टरांविषयी प्रचंड राग निर्माण झाला. काल रात्री तो डॉक्टरांशी चर्चा करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आला. दोघांमध्ये चर्चा सुरू असताना त्यांचे शाब्दिक वाद झाले.

तेव्हा राजेंद्र मोरे याने धावत गेले. त्यावेळी राठी कॅबिनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ प्राथमिक उपचार सुरू केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने रात्री राठी यांना अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

राजेंद्र चंद्रकांत मोरे हल्ल्यानंतर पसार झाला असून, पोलिसांनी घटनास्थळावरून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज माध्यमातून शोध सुरू केला आहे. सुयोग हॉस्पिटलचे संचालक राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे समजताच घटनास्थळी परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली.



या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group