नाशिकमधून ताब्यात घेतले डोंबिवली  स्फ़ोट मधील संशयित; युनिट 1 व ठाणे गुन्हे शाखेची कारवाई
नाशिकमधून ताब्यात घेतले डोंबिवली स्फ़ोट मधील संशयित; युनिट 1 व ठाणे गुन्हे शाखेची कारवाई
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- डोंबिवली येथे काल झालेल्या रासानिक कारखान्यातील स्फ़ोट प्रकारणी कारखाना मालक मालती प्रदीप मेहता यांना ठाणे व नाशिकच्या गुन्हे शाखेने नाशिक मधून ताब्यात घेतले.

डोंबिवली येथे काल झालेल्या रासानिक कारखान्यात स्फ़ोटात ११ जणांचा मृत्यु झाला तर 60 जण जखमी झाल्याने कारखाना संचालक मालती प्रदीप मेहता यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर मेहता यांनी पोलिसांना गुंगारा देऊन त्या फरार झाल्या. तांत्रिक विश्लेषण विभागाची मदत घेऊन मेहता यांचा शोध घेतला असता त्या नाशिक मध्ये असल्याची माहिती ठाणे गुन्हे पथकाला समजली.

नाशिक युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड व ठाणे पोलिसांनी संयुक्त तपास करून नाशिक मध्ये नातेवाईकाकडे आश्रय घेत लपून बसलेल्या मालती मेहता यांना ताब्यात घेऊन ठाणे पोलीस रवाना झाले. पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही शोध मोहीम राबवली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group