संघ लोक सेवा आयोग अर्थात यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच सोनी यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मनोज सोनी यांनी गेल्याचवर्षी पदभार स्विकारला होता. त्यामुळे कार्यकाळ संपण्याआधीच त्यांनी हा मोठा निर्णय घेतल्याने चर्चा रंगल्या आहेत. वैयक्तिक कारणांमुळे सोनी यांनी हा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. त्यांनी जून अखेरीस राजीनामा दिला होता.
मात्र, त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला की नाही याची पुष्टी झालेली नाही. परंतु, सोनी यांच्या राजीनाम्यामुळे अनेकप्रकारचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून काही आयएएस अधिकारी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले असतानाच सोनी यांनी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे.