पोलिसांची नोटीस मिळाल्यानंतर माजी महापौर विनायक पांडे यांनी दिली
पोलिसांची नोटीस मिळाल्यानंतर माजी महापौर विनायक पांडे यांनी दिली "ही" प्रतिक्रिया
img
दैनिक भ्रमर
 नाशिक (प्रतिनिधी) : ड्रग्ज माफिया ललित पाटील यांच्याशी सन २०१६ नंतर माझा कोणताही प्रकारे संबंध नाही, तसेच संपर्क देखील नाही.

त्यामुळे या संदर्भातील पोलिसांच्या कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याला आपण तयार आहोत, मात्र या संदर्भात नोटीस आली नसून केवळ विचारपूस करण्यासाठी आपल्याला बोलविण्यात आले आहे. माझ्याकडे परदेशी नावाचा ड्रायवर होता. त्याची ललित पाटीलच्या प्रकरणात गाडीबाबत चौकशी झाली होती. तेव्हा आपण माजी महापौर विनायक पांडे यांचा ड्रायवर असल्याचे सांगितले.

त्यामुळे त्या गाडी बाबत मला विचारणा होऊ शकते. कोणत्याही चौकशीला आपण सामोरे येण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल असेही ते म्हणाले. त्यामुळे याप्रकरणी घाबरण्याचे कारण नाही, असे स्पष्ट मत माझे महापौर विनायक पांडे यांनी व्यक्त केले आहे.

हे ही वाचा : धक्कादायक: वडाळा परिसरात बेवारस बॅग आढळली; उघडून पाहताच पोलिसही चक्रावले
https://dainikbhramar.com/news/v/791/shocking-abandoned-bang-found-in-wadala-area-even-the-police-were-confused-when-they-opened-it
  
यासंदर्भात अधिक माहिती देताना विनायक पांडे म्हणाले की, मला तसेच माझा मुलगा ऋतुराज पांडे याला या प्रकरणात विनाकारण गोवले जात आहे. हे सर्वांनाच माहित आहे. ज्या गोष्टीशी आपला संबंध नाही, त्यामुळे या प्रकरणी कशाचीही चौकशी केली तरी आपल्याला काही फरक पडणार नाही, असे स्पष्टीकरण देखील माजी महापौर विनायक पांडे यांनी केले आहे. तसेच या प्रकरणी आपल्याला राजकीय हेतूने प्रेरीत होऊन राजकीय विरोधक अडकवण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही विनायक पांडे यांनी म्हटले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group