Maratha Reservation : आंदोलनकर्त्यांनी फोडले
Maratha Reservation : आंदोलनकर्त्यांनी फोडले "या" आमदाराचे कार्यालय
img
दैनिक भ्रमर
मराठा आरक्षणावरून राज्यभरात आंदोलन आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणावरून अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन सुरू आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापुरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांचे शहरातील कार्यालय मराठा आंदोलकांनी फोडले आहे. यावेळी कार्यालयातील सामानाची नासधूस करत काचा फोडल्या, खुर्च्या देखील तोडल्या आहेत. 

 मराठवाड्यात ठिकठिकाणी हिंसक आंदोलन देखील पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात येऊन त्यांना अडवून जाब विचारला जात आहे. तर, काही ठिकाणी तोडफोड, जाळपोळ देखील पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातील आमदार प्रकाश सोळुंके यांचे घर पेटून दिल्यानंतर, आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.

यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. बंब यांचे कार्यालय फोडल्यानंतर गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी ही केली आहे. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेऊन, रस्ता मोकळा केला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group