ऑक्सिजन सिलेंडर  वाहून नेणाऱ्या गाडीतील सिलेंडरचा स्फोट
ऑक्सिजन सिलेंडर वाहून नेणाऱ्या गाडीतील सिलेंडरचा स्फोट
img
दैनिक भ्रमर

नाशिक (प्रतिनिधी) :- गंगापूर रोडवरील प्रसाद मंगल कार्यालयाजवळ शांतीनिकेतन चौकात एम एच 15 डिके 51 84 या क्रमांकाच्या छोटा हत्ती गाडीत ऑक्सिजन सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली.

चौकात असलेल्या रम्ब्लरमुळे हा स्फोट झाल्याची शक्यता तेथील नागरिकांनी वर्तविली. या गाडीत एकूण तीन सिलिंडर होते. सुदैवाने आणखी दोन सिलिंडरचा स्फोट न झाल्याने पुढील अनर्थ टळला. स्फोट होताच त्या चौकाजवळील काही इमारतींच्या काचा फुटल्या, तसेच काही चारचाकी व तेथेच असलेल्या कॅफेमधील काचाही फुटल्याने रहिवासी घाबरले होते.

या स्फोटात ड्रायव्हर गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. गाडीचे पूर्णपणे नुकसान झाले. घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी गर्दी केल्याने वाहतूक खोळंबली होती. घटनेची माहिती मिळताच आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि संबंधित अधिकार्‍यांना तेथे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यास सांगितले. गंगापूर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group