वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरला जाणाऱ्या वाहनांबाब, शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरला जाणाऱ्या वाहनांबाब, शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय
img
Dipali Ghadwaje
मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा जीआरही काढण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यभरातील विठुरायांना सध्या आषाढी एकादशीचे वेध लागले आहेत. पंढपुरला विठुरायांच्या भेटीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत. अशातच राज्य सरकारने मोठा निर्णय घेत पंढरपुरला जाणाऱ्या वाहनांना टोल माफ केले आहेत.

१७ जुलै रोजी पंढपुरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक पंढरपुरकडे जात असतात. या सर्व वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तीन जुलैपासून ते 21 जुलै पर्यंत ही टोलमाफी असणार आहे. अक्षय महाराज भोसले यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group