'रात्रीस खेळ चाले' , नातेपुते स्मशानभूमीत मध्यरात्रीच्या वेळी अघोरी प्रकार, जळत्या चितेच्या शेजारी...
'रात्रीस खेळ चाले' , नातेपुते स्मशानभूमीत मध्यरात्रीच्या वेळी अघोरी प्रकार, जळत्या चितेच्या शेजारी...
img
वैष्णवी सांगळे
अंधश्रद्धा हा प्रकार महाराष्ट्रासाठी आता काही नवीन राहिला नाही. अंधश्रद्धेमुळे अनेक अघोरी, भयानक प्रकार , जीवघेणे प्रकार पहायला मिळत आहे. दरम्यान 
माळशिरस तालुक्यातील नातेपुते स्मशानभूमीत मध्यरात्रीच्या वेळी अघोरी प्रकार चालू असल्याचे निदर्शनास आले आहेत. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

नातेपुतेच्या वैकुंठ स्मशानभूमी जळत्या चितेच्या शेजारी काळ्या बाहुल्या, लिंबू सुया आणि काही व्यक्तींचे फोटो आढळून आले. तसेच कवाळ, कोंबड्या अशा गोष्टी मध्यरात्रीच्या वेळी कुणीतरी ठेवल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे माळशिरस गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

धक्कादायक म्हणजे ज्या चितेजवळ हा सर्व अघोरी प्रकार सुरु होता त्या चितेमधील काही अवशेष देखील गायब असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. नातेपुते गावातील रहिवाशांच्या सांगण्यानुसार अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री अशा वस्तूंचे प्रमाण वाढते. मात्र सातत्याने अशा वस्तू दिसत असल्याने जादूटोण्यासारखे प्रकार नातेपुते सुरू असल्याचे पुढे येत आहे. 

या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून नातेपुते पोलिसांच्या वतीने आघोरी कृत्य करून समाजात भीतीचे वातावरण असणाऱ्या लोकांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा थेट इशारा देण्यात आला आहे. तर अशा वस्तू स्मशानभूमीत ठेवणाऱ्यांचा शोध देखील सुरू करण्यात आला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group