अंगणवाडीतील खिचडीत आढळला मेलेला बेडूक ;  कुठे घडला
अंगणवाडीतील खिचडीत आढळला मेलेला बेडूक ; कुठे घडला "हा" धक्कादायक प्रकार
img
DB
पंढरपूर :  पंढरपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंढरपुरात पोषण आहारात  मृत बेडूक आढळले आहे. कासेगावच्या भुसेनगरमधला हा धक्कादायक प्रकार आहे. बेडकाचं मृत पिल्लू पोषण आहारात सापडलंय.  या प्रकरणानंतर परिसरात  एकच खळबळ उडाली आहे 

या अगोदर देखील कासेगावमध्ये शालेय पोषण आहारामध्ये  मेलेला किडा आढळला होता. परंतु त्यावेळी पालकांनी दुर्लक्ष केले. आठवडाभरातच आता हा दुसरा प्रकार समोर आल्याने या प्रकारानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केलाय. शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलाय की काय असा सवाल आता उपस्थित केला जातोय. 

शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यातही तसेच शाळेची गोडी लागण्यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक शालेय पोषण आहार ही योजना अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शालेय पोषण आहार हा आता विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला आहे की काय अशी शंका या पोषण आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांच्या मानसिकतेमधून दिसत आहे.  शासनाने यावर कारवाई करावी अशी मागणी  संतप्त पालकांनी केली आहे.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group