''त्या'' 9 महिलांना पोलिसांनी केली अटक, 5 वर्षांपासून करत होत्या बार मध्ये काम , काय आहे प्रकार ?
''त्या'' 9 महिलांना पोलिसांनी केली अटक, 5 वर्षांपासून करत होत्या बार मध्ये काम , काय आहे प्रकार ?
img
दैनिक भ्रमर
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात अवैधरित्या वास्तव करणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. दरम्यान आता अशीच एक घटना समोर आली आहे . बांगलादेशी असणाऱ्या  9  महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. 

समोर आलेल्या  माहितीनुसार, कल्याण-भिवंडी जवळच्या कोनगावमधल्या ऑक्रेस्ट्रॉ बारमधून पोलिसांनी 9 महिलांना अटक केली आहे. या सर्व 9 महिला बांगलादेशी असल्याचं तपासात समोर आलं आहे. या महिला ठाकूर पाडा भागातल्या चाळीमध्ये बेकायदेशीररित्या कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय राहत होत्या. महिलांच्या कागदपत्रांची कोणतीही चौकशी न केल्याने चाळीच्या मालकाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक ठाकरे या चाळ मालकाने कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी न करता या बांगलादेशी महिलांना राहण्यासाठी जागा दिली होती. या महिलांनी भारत-बांगलादेश सीमेवरून अवैधरित्या घुसखोरी केली, त्यानंतर त्या भिंवडीमध्ये मागच्या 5 वर्षांपासून राहत होत्या. याप्रकरणी कोनगाव पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता, पासपोर्ट कायदा आणि परदेशी नागरिक कायद्याअनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘मागच्या काही महिन्यात या भागात अनेक बांगलादेशी नागरिक अवैधरित्या राहत असल्याचं समोर येत आहे. आतापर्यंत असे 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यात एकूण 24 बांगलादेशी महिला आणि पुरुषांना अटक करण्यात आली आहे’, अशी माहिती कोनगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम म्हस्के यांनी दिली आहे.

पोलिसांच्या खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडीच्या क्राईम ब्रांचने न्यू मराठी स्कुल जवळ असलेल्या ठाकूर पाडा भागात गुरूवारी धाड टाकली, तेव्हा तिकडे 9 बांगलादेशी महिला होत्या, अशी माहिती भिवंडी क्राईम ब्रांचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राज माळी यांनी दिली आहे.

दरम्यान , सीमा बेगम सिराज (वय 27), रेखा अनिसराम राम (वय 24), रुपा अनिसराम राम आका सती इक्बाल हुसैन अख्तर (वय 24), अंजनी हबीज शा (वय 23), शारदा बन्सी साहु (वय 42), ममता शारदा साहु (वय 26), पायल राजू साहु (वय 28), पिंकी शारदा साहु (वय 45) आणि काजल शांतरावन्सी साहु (वय 20) अशी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी महिलांची नावं आहेत. याशिवाय दीपक गंगाराम ठाकरे या 45 वर्षांच्या चाळीच्या मालकालाही पोलिसांनी अटक केली आहे. या छाप्यातून पोलिसांनी 70 हजार रुपयांचे फोन, महिलांचे पासपोर्ट आणि इतर वैयक्तिक कागदपत्र ताब्यात घेतली आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group