इस्रायलकडून तिसऱ्यांदा एअर स्ट्राईक, हमासचे 2200 ठिकाणं उद्ध्वस्त; 'इतक्या' लोकांचा मृत्यू
इस्रायलकडून तिसऱ्यांदा एअर स्ट्राईक, हमासचे 2200 ठिकाणं उद्ध्वस्त; 'इतक्या' लोकांचा मृत्यू
img
Dipali Ghadwaje
इस्रायलने आता हमास विरुद्धचे हल्ले आणखी वाढवले आहेत. इस्रायल आणि हमासमध्ये घमासान युद्ध सुरू असून दिवसेंदिवस या युद्धाची तीव्रता वाढताना दिसत आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास इस्रायलने पुन्हा एकदा बॉम्बचा वर्षाव करत अनेक ठिकाणे उध्वस्त केली. यामध्ये हमासचे लष्करी प्रमुख मोहम्मद दायिफ यांच्या वडिलांचे घराचाही समावेश आहे. एका वृत्त संस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे.  

इस्रायलने आतापर्यंत हमासच्या 2200 हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केले आहे. याशिवाय इस्रायलच्या हवाई दलाने हमासचे लष्करी प्रमुख मोहम्मद दायिफ यांच्या वडिलांचे घरही उद्ध्वस्त केले. डायफ हा इस्रायलवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचे बोलले जात आहे.

हमास आणि इस्रायल युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत जळपास 900 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 260 मुले आणि 200 महिलांचा समावेश आहे. तसेच 4 हजार 250 लोक जखमी झाले आहेत.
 
याशिवाय इस्त्रायली सैन्याने आपल्या भागात 1500 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तत्पुर्वी हमासने इस्रायलवर हजारो रॉकेट डागले होते.याशिवाय हमासचे हजारो दहशतवादी इस्रायलमध्ये घुसले होते. त्यांनी नि:शस्त्र इस्रायली लोकांवर क्रूर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 1200 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल हमासच्या स्थानांवर सातत्याने बॉम्बफेक करत आहे. इस्रायलच्या सततच्या गोळीबारामुळे हमास हादरवून गेला आहे. आतापर्यंत हमासमधील शेकडो इमारती उध्वस्त झाल्या असून सर्वत्र केवळ ढिगारा आणि धूर दिसत आहे. हमासकडून युद्ध थांबण्याची विनंती करण्यात आली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group