राज्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर राज्यातील घडामोडीं आला आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महाविकास आघाडीची सभा पार पडली.या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह इंडिया आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. या सभेत महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रासाठी आश्वासन देण्यात आले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर कृषि समृद्धी योजना राबवून शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करू तसेच ५० हजार प्रोत्साहनपर रक्कम म्हणून देऊ, अशी घोषणा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. महाविकास आघाडीने लोकसेवेची पंचसूत्री जाहीर केली. इंडिया आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ बीकेसी मैदानावर फोडला
दरम्यान, राहुल गांधी यांनी महालक्ष्मी योजनेवर सविस्तर भाषण केल्यानंतर शरद पवार यांच्याकडे कृषि समृद्धी योजनेची माहिती देण्याची जबाबदारी होती. विधानसभेची निवडणूक होत आहे. हे राज्य कसे चालवायचे, कसे ठेवायचे हे ठरविण्याची वेळ आली आहे, असे सांगताना उद्धवजींचा काळ सोडला तर बाकीचे काळ राज्य मागे गेले, अशी टीका त्यांनी महायुती सरकारवर केली. आम्ही कृषी गॅरंटी देत आहोत असे जाहीर करून शेतकऱ्यांचे ३ लाखापर्यंत कर्ज माफ करू तसेच नियमित कर्ज भरणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन म्हणून देऊ, अशी घोषणा शरद पवार यांनी केली.
मनमोहन सिंह यांचे सरकार होते तेव्हा आम्ही शेतकऱ्यांचे ७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. आताही आम्ही बळीराजाला सन्मानाने जगता यावे याकरीता त्याच्या पाठीवरील ओझे कमी करण्याचा निर्णय घेऊ, असे पवार म्हणाले.