भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला मिळणार...., मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला मिळणार...., मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
img
Dipali Ghadwaje
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये महिलांच्या ५० किलो कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी वजन जास्त आढळल्याने भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला बुधवारी ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं. अपात्र ठरल्यानंतर फोगट हिने कुस्तीतून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. याच दरम्यान, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. विनेश फोगटला सिल्वर मेडलसारखं बक्षीस, सन्मान आणि सुविधा मिळणार असल्याचं म्हटलं आहे.

हरियाणाची आमची शूर कन्या विनेश फोगट हिने जबरदस्त कामगिरी करून ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता, काही कारणांमुळे ती ऑलिम्पिकची फायनल खेळू शकली नाही, पण ती आपल्या सर्वांसाठी चॅम्पियन आहे. आमच्या सरकारने ठरवलं आहे की, विनेश फोगटचं स्वागत आणि अभिनंदन हे एका मेडलिस्टसारखंच केलं जाईल. हरियाणा सरकार सिल्वर मेडल विजेत्याला जो सन्मान, बक्षीस आणि सुविधा देतं, त्या सर्व विनेश फोगटला दिल्या जातील. आम्हाला तुझा अभिमान आहे विनेश! असं हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हरियाणा सरकारने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूला ६ कोटी रुपये, रौप्यपदक विजेत्याला ४ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. याशिवाय ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना १५ लाख रुपयांची रक्कमही देण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने सांगितलं होतं. यासोबतच मेडलनुसार ग्रुप ए, ग्रुप बी किंवा ग्रुप सी सरकारी नोकरीही दिली जाणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group