मोठी बातमी! भारताला मोठा धक्का , अंतिम सामन्यापूर्वी विनेश फोगाट अपात्र, काही ग्रॅम वजनाने अपेक्षाभंग
मोठी बातमी! भारताला मोठा धक्का , अंतिम सामन्यापूर्वी विनेश फोगाट अपात्र, काही ग्रॅम वजनाने अपेक्षाभंग
img
DB
भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट हिने 50 किलो फ्रीस्टाइल गटात शानदार कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली. विनेश फोगाटने क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेझविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. 

विनेश फोगाट ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू, तर सुशील कुमारनंतरची पहिली भारतीय ठरली. मात्र अंतिम सामन्याआधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 

विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे. विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे.  त्यामुळे विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याचं सांगण्यात येत आहे. विनेश फोगाट रौप्य आणि कांस्य पदकासाठीही पात्र होणार नाही. दरम्यान विनेश फोगाटने अंतिम फेरी गाठल्यानंतर संपूर्ण भारतात आनंद दिसत होता. परंतु आता विनेश फोगाटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्याने सर्वत्र निराशा पसरली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group