विनेश फोगटला रौप्य पदक मिळणार का नाही? क्रीडा लवादाचा निर्णय अखेर समोर
विनेश फोगटला रौप्य पदक मिळणार का नाही? क्रीडा लवादाचा निर्णय अखेर समोर
img
दैनिक भ्रमर
कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत 100 ग्रॅम जास्त वजन भरल्याने अपात्र ठरवण्यात आले आले होते . त्यानंतर विनेशने सीएएस अर्थात कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टमध्ये धाव घेतली. सीएएसने विनेशची तिला अंतिम सामन्यात खेळू देण्याची मागणी फेटाळली. त्यामुळे विनेशने त्यानंतर आपल्याला संयुक्तरित्या रौप्य पदक विजेता घोषित करण्यात यावं, अशी मागणी केली होती.  

दरम्यान , भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमधून निराशाजनक बातमी समोर आली आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हीला आता रौप्य पदकह  मिळणार नाही. क्रीडा लवादाने ( कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट) विनेश फोगाट हीची याचिका फेटाळली आहे.  विनेशने वाढीव वजनानंतर अपात्रत ठरवल्यानंतर सीएएसमध्ये धाव घेतली होती. आपल्याला किमान संयुक्तरित्या रौप्य पदक देण्यात यावं, अशा मागणीची याचिका विनेशने केली होती. मात्र सीएएसने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे भारताला रौप्य पदक मिळणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

विनेशने मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी 50 किलो वजनी गटात सलग 3 सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. विनेश ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहचणारी पहिला महिला ठरली. विनेशने प्री क्ववार्टर फायनल सामन्यात टोक्यो ऑलिम्पिक चॅम्पियन यूई सुसाकी हीचा 3-2 अशा फरकाने पराभव केला. त्यानंतर क्वार्टर फायनलमध्ये युक्रेनच्या ओक्साना लिवाच हीचा 7-5 अशा फरकाने धुव्वा उडवत उपांत्य फेरीत धडक दिली. तर सेमी फायनलमध्ये विनेशने क्यूबाच्या गुजमॅनवर 5-0 ने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. विनेशने यासह भारतासाठी रौप्य पदक निश्चित केलं. विनेशचा अंतिम फेरीतील सामना हा 7 ऑगस्ट रोजी यूएसएच्या एन सारा हिल्डेब्रांट विरुद्ध होणार होता. मात्र त्याआधी विनेशचं वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं निदर्शनात आलं. त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group