भारताची युवा शटलर नित्या सुमती सिवनने पॅरिस पॅरालिम्पिक2024 मध्ये पदक जिंकण्यात यश मिळविले आहे. कांस्यपदकासाठी खेळल्या गेलेल्या सामन्यात नित्याने इंडोनेशियाच्या रीना मार्लिनाचा 21-14, 21-6 असा पराभव केला. तिने या पूर्वी देखील 11 महिन्यांपूर्वी आशियाई पॅरा गेम्समध्ये कांस्यपदक जिंकले होते. बॅडमिंटनमधील सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी एकूण पाच पदके मिळाली.
भारतीय बॅडमिंटनपटू नित्या सुमती हिने सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री झालेल्या सामन्यात कांस्यपदक जिंकल्यानंतर भारताच्या एकूण पदकांची संख्या 15 वर पोहोचली आहे. नित्याच्या विजयानंतर भारत एकूण पदकतालिकेत 15 व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताच्या नावावर सध्या तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि सात कांस्यपदके आहेत.