आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची मोठी कामगिरी, 'पदकांचे' ऐतिहासिक शतक झळकावले
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची मोठी कामगिरी, 'पदकांचे' ऐतिहासिक शतक झळकावले
img
Dipali Ghadwaje
23 सप्टेंबरपासून  चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. यावेळी 655 खेळाडूंचा भारताचा संघ '100 च्या पुढे' असा नारा देत मैदानात उतरला होता. त्यानंतर भारत 100 पदके जिंकेल अशी सर्व चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र या खडतर वाटेवर भारतीय खेळाडूंनी हिंमत हारली नाही आणि दिवसेंदिवस एकामागून एक पदके जिंकतच राहिले.   

आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये भारतीय खेळाडूंनी एकूण 111 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये 29 सुवर्णपदकं, 31 रौप्यपदकं आणि 51 कांस्यपदकांचा समावेश आहे.
भारताने स्पर्धेच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी चार सुवर्णपदके, दोन रौप्यपदके आणि सहा कांस्य पदकांसह 12 पदके जिंकली. आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने पहिल्यांदाच 100 पदकांचा टप्पा गाठला आहे. ही भारताची आशियाई पॅरा गेम्समधील आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. यापूर्वीची 2018 मध्ये भारताने 72 पदके जिंकली होती, ज्यामध्ये जेव्हा  15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 33 कांस्य पदकांचा समावेश होता. 

 या उल्लेखनीय कामगिरीसह, भारतीय पॅरा-अ‍ॅथलीट्सने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुदृढ शरीराच्या खेळाडूंच्या यशाला तोडीस तोड 100 पदकांचा टप्पा गाठला. आशियाई खेळ 2023 सर्प्धेत भारताने विक्रमी 107 पदके जिंकली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई पॅरा गेम्स 2023 मधील भारतीय खेळाडूंच्या दमदार कामगिरीचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे की, 'एशियन पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी 100 हून अधिक पदकं जिंकण्याचा विक्र केला आहे, ही खूप मोठी आनंदाची बाब आहे. हे यश आपल्या खेळाडूंची प्रतिभा, कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय याचाच परिणाम आहे. हा उल्लेखनीय मैलाचा दगड भारतीयांच्या अंतःकरणात अपार अभिमानाने भरलेला आहे. मी याबद्दल खेळाडूंचे मनापासून कौतुक आणि कृतज्ञता व्यक्त करतो.'

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group