नाशिक (प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी स्टेडियमवर असलेल्या खो-खोच्या मैदानाजवळील खेळाडूंच्या साहित्य ठेवण्याचे ठिकाणी असलेले पोस्टर व इतर वस्तू फाडून फेकून दिल्याने या खेळाचे पदाधिकारी व खेळाडूंनी जाहीर निषेध नोंदवला आहे .
नाशिक जिल्हा खो खो असो. आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक संचलित छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे विनामुल्य खो खो प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रात सकाळ आणि सायंकाळी खेळाडू सराव करत असतात. हे केंद्र संकुलाच्या एका बाजूला असुन खो खो मैदानाला सर्व बाजूंनी लोखंडी जाळी आणि दरवाजा लावून बंदिस्त केले आहे.
खो खो मैदानाची तसेच विविध वयोगटाच्या स्पर्धांमध्ये नाशिक जिल्ह्याच्या संघांनी जे यश मिळविले त्यांचे फ्लेक्स स्टेज वर व्यवस्थित फ्रेम मध्ये पेस्ट करून लावले होते. जे ग्राउंड लेव्हल पासून सुमारे सहा ते आठ फूट उंचीवर होते ते सर्व फ्लेक्स ब्लेड अथवा कटरच्या मदतीने फाडून स्टेज वर तसेच अन्यत्र मैदानावर फेकून आज दुपारी काही अज्ञात व्यक्तींनी आपल्या विकृतीचे दर्शन घडविले. सध्या संकुलाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने तेथील CCTV बंद असल्याने त्याचा फायदा घेऊन काही समाजकंटकांनी त्याचा फायदा घेत संपूर्ण राज्यभर आपल्या कामगिरी द्वारे नाशिक जिल्ह्याच्या आलेख उंचावला होता असे ते फ्लेक्स फाडले.
नाशिक जिल्हा खो खो असोसिएशन ह्या भ्याड कृत्याचा निषेध नोंदवला आहे.