भारताचा आठवा सुवर्णवेध!  १० मीटर पिस्तूल स्पर्धेत पलकला गोल्ड तर ईशाला सिल्वर मेडल
भारताचा आठवा सुवर्णवेध! १० मीटर पिस्तूल स्पर्धेत पलकला गोल्ड तर ईशाला सिल्वर मेडल
img
Dipali Ghadwaje
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा दबदबा सुरूच आहे. आशियाई स्पर्धा 2023 मध्ये महिलांच्या 10 मीटर पिस्तूल प्रकारात भारताला सुवर्ण पदक मिळालं आहे. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताच्या नेमबाजीमध्ये पलकने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तर, ईशा सिंगने रौप्यपदक पटकावलं आहे. 

भारताचं हे आठवं सुवर्ण पदक आहे. आशियाई स्पर्धा 2023 मध्ये भारताने आतापर्यंत 30 पदकांची कमाई केली आहे. भारतीय संघाने सहाव्या दिवसाची देखील दमदार सुरूवात केली आहे. स्पर्धेतील सहाव्या दिवशी भारतीय नेमबाजांनी पदकांच्या यादीत भर घातली आहे

१० मीटर पिस्तूल प्रकारात महिला खेळाडू पलक, दिव्या सुब्बाराजू थडिगोल आणि ईशा सिंगने रौप्यपदकाला गवसणी घातली. त्यानंतर ५० मीटर रायफल ३ पी पुरूषांच्या क्रीडा प्रकारात १७६९ गुणांसह भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात स्वप्निल सुरेश कुसाले, ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर आणि सुरेश कुसाले यांनी मोलाची भुमिका बजावली आहे. 

महिलांच्या १० मीटर पिस्तूल प्रकारात भारतीय महिला खेळाडूंनी दमदार कामगिरी गेल्याचे पाहायला मिळाले आहे. या प्रकारात भारतीय नेमबाज पलकने २४२.१ गुणांची कमाई करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहेे. तर ईशा सिगंने २३९.७ गुणांची कमाई करत रौप्यपदक पटकावलं आहे.

 आशियाई क्रीडा स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताची पदकांची संख्या..

  • एकुण पदकं- ३०

  • सुवर्ण- ८

  • रौप्य -११

  • कांस्य- ११

  • सुवर्णपदक- ५० मीटर रायफल ३ पी (पुरुष,सांघिक)

  • रौप्यपदक - १० मीटर एयर पिस्तूल (महिला, सांघिक)

  • रौप्यपदक- टेनिस पुरुष दुहेरी

  • सुवर्णपदक - पलक ( १० मीटर एयर पिस्तूल, महिला)

  • रौप्यपदक- ईशा सिंग (१० मीटर एयर पिस्तूल)
इतर बातम्या
Join Whatsapp Group