टीम इंडियासमोर अडचणी वाढल्या ;
टीम इंडियासमोर अडचणी वाढल्या ; "हे" आहे कारण?
img
Dipali Ghadwaje
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श पूर्णपणे तंदुरुस्त आहे. तो 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये होणाऱ्या पिंक बॉल टेस्टमध्ये खेळू शकतो. एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार खुद्द मार्शने ऑस्ट्रेलियन स्पोर्ट्स चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. त्याच्या फिटनेसबाबत मार्शने मुलाखतीत सांगितले की, त्याचे शरीर पूर्णपणे ठीक आहे, तो दुसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

पर्थ कसोटीनंतर मार्शच्या स्नायूंना ताण आला होता. मार्शच्या दुखापतीवर ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड म्हणाले होते की, 'मार्शच्या फिटनेसबद्दल काही शंका आहे.' ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनेही मार्शच्या फिटनेसवर चिंता व्यक्त केली होती. मार्शला दुखापत झाल्यानंतर तस्मानियाचा अष्टपैलू खेळाडू ब्यू वेबस्टरचा संघात समावेश करण्यात आला होता.

वेबस्टर फिरकी आणि मध्यमगती गोलंदाजीसह फलंदाजी करू शकतो. वेबस्टरने भारत-अ विरुद्धच्या अनधिकृत कसोटीच्या चार डावांत दोनदा नाबाद असताना 145 धावा केल्या होत्या. तसेच सात विकेट्स घेतल्या. एवढेच नाही तर सिडनीतील शेफिल्ड शिल्डमध्ये न्यू साउथ वेल्सविरुद्ध त्याने 61 आणि 49 धावा केल्या आणि 5 बळीही घेतले.

टीम इंडिया BGT 1-0 ने आघाडीवर  

भारत बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत भारतीय संघ 1-0 ने आघाडीवर आहे. संघाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा चार दिवसांत 295 धावांनी पराभव केला. बॉर्डर-गास्कर ट्रॉफीचा दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. सध्या भारतीय कसोटी संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 295 धावांनी विजय मिळवला आहे. 
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group