आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मॅच फिक्सिंग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 2021 एमिरेट्स टी-10 लीग दरम्यान अनेक खेळाडू, अधिकारी आणि काही भारतीय संघ मालकांवर भ्रष्ट कारवायांमध्ये गुंतल्याबद्दल गंभीर आरोप झाले आहेत. हे आरोप अबू धाबी T10 लीगशी संबंधित आहेत. ही स्पर्धा 19 नोव्हेंबर 2021 ते 4 डिसेंबर 2021 दरम्यान झाली होती. या स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले होते.
दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने इमिरेटस क्रिकेट मंडळाच्या वतीने तीन भारतीयांसह आठ जणांवर इमिरेटस टी १० लीग क्रिकेटमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्यांच्यावर बंदी टाकण्यात आली आहे. त्यात पराग संघवी आणि क्रिशन कुमार चौधरी या दोन भारतीय संघ मालकांचा समावेश आहे.
संघवी आणि चौधरी हे पुणे डेव्हिल्स या संघाचे मालक असून त्यांच्या संघातील एक असलेला बांगलादेशचा माजी कसोटीपटू नासीर हुसेन याच्यावरही आरोप ठेवण्यात आला आहे. लीगच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने हे आरोप ठेवले आहेत. सनी ढिल्लोन हा तिसरा भारतीय असून तो फलंदाजी प्रशिक्षक आहे.
२०२१ च्या अबू धाबी टी१० क्रिकेट लीगमध्ये हा गैरप्रकार झाला असून मात्र, हा गैरप्रकार उधळून लावण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि आरोप निश्चित करण्यासाठी ईसीबीने आयसीसीची भ्रष्टाचार विरोधी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती, असे आयसीसीने म्हटले आहे.
निकालावर, सामना सुरू असताना त्यावर जुगार खेळणे किंवा पैसा लावणे हा आरोप संघवी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे चौकशी अधिकाऱ्याला सहकार्य न करणे, उपस्थित न राहणे, नकार देणे असाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. चौधरी यांच्यावरही विविध आरोप लावण्यात आले आहे. त्यात एखाद्या घटनेची माहिती देण्यात अपयशी ठरणे, त्याचप्रमाणे सामना ‘फिक्स'' करणे हे मुख्य आरोप आहेत.
नासीरने १९ कसोटी व ६५ एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले असून मिळालेल्या ७५० अमेरिकन डॉलर्स भेटवस्तुबाबत तो खुलासा करू शकला नाही. त्यामुळे त्यालाही दोषी ठरविण्यात आले.
याशिवाय फलंदाजी प्रशिक्षक अझर झैदी, संयुक्त अरब अमिरातीचा खेळाडू रिझवान जावेद, सलिया समन आणि व्यवस्थापक शदाब अहमद यांच्यावरही बंदी टाकण्यात आली आहे. या सर्वांना १४ दिवसांच्या आत आरोपाला उत्तर द्यायचे आहे.