
२ ऑक्टोबर २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- ओझर येथील एचएएल सायन्स अॅण्ड कॉमर्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी आकांक्षा संदीप शिंदे हिची एशियन ओपन ज्युदो चॅम्पियनशिप २०२४ स्पर्धेकरीता भारतीय संघात निवड झाली. ही स्पर्धा कझाकस्तान येथे होणार आहे.
११ ते १४ ऑक्टोबर दरम्यान होणार्या एशियन गेम ज्युदोे चॅम्पियनशिप साठी ४८ किलो वजन गटांमध्ये आकांक्षाची निवड झाली आहे. यापूर्वीही आकांक्षा हिने इंग्लंडमध्ये झालेल्या कॉमन वेल्थ स्पर्धेमध्ये भारताला सुवर्ण पदक प्राप्त करून दिले होते. त्याचबरोबर ऑल इंडिया युनिव्हर्सिटी, ओपन नॅशनल स्पर्धेमध्ये देखील ती पदक विजेता ठरली होती.
तिच्या या यशाबद्दल संस्थेच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे तसेच विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी तसेच व्यवस्थापन विभागाचे शैलेश गोसावी, प्राचार्य सुर्वे , उपप्राचार्य रत्नावली टिळक यांनी शुभेच्छा दिल्या. तिला प्रो.योगेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्पर्धेसाठी आकांक्षाला शुभेच्छा दिल्या.
Copyright ©2025 Bhramar