किंग खान वादाच्या भोवऱ्यात, स्टेडियममधला
किंग खान वादाच्या भोवऱ्यात, स्टेडियममधला "तो" व्हिडिओ झाला व्हायरल...
img
Dipali Ghadwaje
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननेहमीच कोणत्या ना कोणत्या सिनेमामुळे चर्चेत असतो. पण आता तो कोणत्याही सिनेमामुळे चर्चेत नसून 'आयपीएल 2024'मुळे चर्चेत आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद हा सामना पाहायला किंग खान स्टेडियममध्ये गेला होता. या सामन्यादरम्यानचा शाहरुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख धूम्रपान करत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. 

काल कोलकत्याच्या ईडन गार्डन ग्राऊंडवर आयपीएल 17 व्या सीझनची मॅच होती. कोलकाता विरुद्ध हैदराबाद असा हा सामना होता. यामध्ये कोलकत्याची टीम ४ धावांनी जिंकली. दरम्यानन आयपीएल २०२४ च्या या तिसऱ्या सामन्यासाठी शाहरुख खानने हजेरी लावली होती. तो अनेकदा टीमला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये येतो. तर काही वेळा त्याच्यासोबत सुहाना, आर्यन आणि अबराम ही मुलंही असतात.शाहरुखचा हा लेटेस्ट व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी मात्र त्याला ट्रोल केलं आहे.

ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये धूम्रपान केल्याच्या घटनेवर आता बंगाल क्रिकेट असोसिएशन शाहरुख खानवर कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. याबाबत अद्याप कोणतंही अपडेट आलेलं नाही. 

शाहरुख खानने धूम्रपान करुन ग्राऊंड स्टाफसोबत हुज्जत घातल्याची घटना काही वर्षांपूर्वी घडली होती. त्यामुळे क्रिकेट स्टेडियमवर शाहरुख खान विविध कारणाने वादाच्या भोवऱ्यात अडकतो. याआधी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये त्याच्यावर बंदी होती. ग्राऊंड स्टाफसोबत बाचाबाची केल्याने त्यावर पाच वर्षांसाठी स्टेडियममध्ये येण्यास बंदी घातली होती.

अशातच आता ईडन गार्डन्समधील त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धूम्रमान केल्याने बंगाल क्रिकेट असोसिएशनने अॅक्शन घ्यायला हवी, असं नेटकरी म्हणत आहेत. अद्याप किंग खानने यासंदर्भात काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही. आता बंगाल क्रिकेट असोसिएशन काय अॅक्शन घेणार हे पाहावे लागेल. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group