टीम इंडियाचं मुंबईत ‘स्वॅग से स्वागत’; टीम इंडियाच्या स्वागतासाठी लोटली अलोट गर्दी...
टीम इंडियाचं मुंबईत ‘स्वॅग से स्वागत’; टीम इंडियाच्या स्वागतासाठी लोटली अलोट गर्दी...
img
Jayshri Rajesh
भारत आणि महाराष्ट्राचं क्रिकेटवर किती प्रेम आहे याचा प्रत्यय आज मुंबईत बघायला मिळला . टीम इंडियाचे लाखो चाहते आज मुंबईत नरिमन पॉईंट परिसरात दाखल झाले. या चाहत्यांकडून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली गेली. टीम इंडियाने देशाला वर्ल्ड कप जिंकून दिल्यामुळे प्रत्येक खेळाडूचं क्रिकेट चाहत्यांकडून कौतुक केलं जात आहे . 

नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह हा परिसर समुद्र किनारा लगतचा परिसर आहे. इथे नेहमी पर्यटक येत असतात. मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावर समुद्राला येणारं उधाण, समुद्राच्या लाटा पाहण्यासाठी नेहमी गर्दी बघायला मिळते. पण आज मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावर क्रिकेट चाहत्यांचा भलामोठा जनसागरच लोटला. जिथे बघावं तिथे गर्दी आणि माणसं दिसत होती.

सर्वप्रथम मुंबई विमानतळावर अग्निशमन दलाच्यावतीने टीम इंडियाच्या विमानाला वॉटर सॅल्यूट देण्यात आला आहे. त्यानंतर, स्पेशल बसमधून टीम इंडिया मुंबईतील वानखेडे मैदानावर पोहोचले. जिकडे तिकडे क्रिकेटप्रेमी आणि भारतीय संघाच्या स्वागताला जमलेले क्रिकेट चाहते दिसून आले . मुंबईतील मरीन ड्राईव्हवरील गर्दी पाहाता मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना  मरीन ड्राईव्हकडे न येणाचं आवाहन केलं.

मुंबईत. धो-धो पाऊस पडत असतांनाही या पावसाने टीम इंडियाच्या लाखो चाहत्यांचा उत्साह कमी केलेला नाही. याउलट चाहत्यांच्या आनंदात दुप्पट वाढ झाली . भर पावसात तरुण-तरुणींनी विजयी यात्रेसाठी मरीन ड्राईव्ह परिसरात गर्दी केली . कितीही पाऊस झाला तरी टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावर तरुण उभेच होते. लाखो चाहते आपल्या आवडत्या क्रिकेटरची एक झलक पाहण्यासाठी गेल्या अनेक तासांपासून इथे ताटकळत उभे होते. 

भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी जमलेल्या क्रिकेट प्रेमींच्या गर्दींचे  नियत्रण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना निर्देश दिले.

लोकलमध्येही  तरुणांकडून टीम इंडियाच्या जयघोषाच्या घोषणाही दिल्या गेल्या. लोकलमधील वातावरणदेखील क्रिकेटमय झालं होत. दादर रेल्वे स्थानक, चर्चगेट रेल्वे स्थानक इथे देखील प्रचंड गर्दी होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group