चाहत्यांना धक्का ! मुंबई संघात रोहित शर्माचं नाव नाही, सूर्या अन् शिवम दुबेचाही पत्ता कट , कारण...
चाहत्यांना धक्का ! मुंबई संघात रोहित शर्माचं नाव नाही, सूर्या अन् शिवम दुबेचाही पत्ता कट , कारण...
img
वैष्णवी सांगळे
विजय हजारे ट्रॉफीचा गट टप्पा 24 डिसेंबर ते 8 जानेवारी दरम्यान खेळवला जाणार आहे. मुंबई संघाचा समावेश एलिट गट सी मध्ये असून या गटात सिक्कीम, उत्तराखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब आणि गोवा या संघांचा समावेश आहे. मुंबईचे सर्व गट टप्प्यातील सामने जयपूर येथे होणार आहेत. दरम्यान , मुंबईच्या विजय हजारे ट्रॉफीसाठी जाहीर झालेल्या संघात रोहित शर्माचं नाव नसल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. 

बीसीसीआयने सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना विजय हजारे ट्रॉफी खेळण्याचे निर्देश दिले असले, तरी सध्या रोहित शर्मा उपलब्ध नसल्यामुळे त्याचा समावेश मुंबईच्या संघात करण्यात आलेला नाही.याबाबत एमसीएच्या वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष यांनी स्पष्ट केलं की, रोहित शर्मा आणि इतर भारतीय संघातील खेळाडू जेव्हा उपलब्ध होतील, तेव्हा त्यांचा संघात समावेश करण्यात येईल. सध्या ते खेळण्यासाठी उपलब्ध नसताना संघात नाव टाकणं योग्य ठरणार नाही.मात्र, रोहित केव्हा आणि कोणत्या सामन्यापासून विजय हजारे ट्रॉफीत खेळताना दिसणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांसारख्या मोठ्या नावांना विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबईच्या संघात स्थान देण्यात आलेले नाही. मात्र, याचा अर्थ हे खेळाडू संपूर्ण देशांतर्गत क्रिकेटला मुकणार आहेत, असे नाही. मुंबई सीनियर निवड समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी एका खाजगी वृत्तपत्राशी बोलताना स्पष्ट केले की, “हे सर्व खेळाडू उपलब्ध झाल्यानंतर संघात सामील होतील. सध्या ते उपलब्ध नसताना त्यांना संघात जागा देऊन एखाद्या युवा खेळाडूला बाहेर काढणे योग्य ठरणार नाही.”


इतर बातम्या
Join Whatsapp Group