हिटमॅन रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाप झाला आहे,पत्नी रितिका हिने मुलाला जन्म दिल्याची गोड बातमी समोर आली आहे . पत्नी रितिका सजदेहने मुलाला जन्म दिला आहे. ३ लोकांच्या या कुटुंबात आता आणखी एका चिमुकल्याची एन्ट्री झाली आहे. २०१८ मध्ये रोहितला मुलगी झाली होती. तिचं नाव त्यांनी समायरा असं ठेवलं होतं.
दरम्यान आता मुलगा झाल्यानंतर रोहितची पहिली रिअॅक्शन समोर आली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
रोहितने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन एका फॅमिलाचा फोटो शेअर केला आहे. या फॅमिली फोटोमध्ये ४ लोकं असल्याचं दिसून येत आहे. या फोटोवर कॅप्शन देत त्याने, 'आमच्या ४ लोकांचं कुटुंब...'असं लिहिलं आहे. यासह त्याने त्याची जन्म तारीखही लिहीली आहे. रोहितची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.
रोहित आणि रितिका हे दोघेही १३ डिसेंबर २०१५ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. एका कार्यक्रमात दोघांची भेट झाली होती. दोघांनी ६ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर विवाह करण्याचा निर्णय घेतला होता.
रितिका सध्या मुंबईतील एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आहे. रोहित दुसऱ्यांदा बाबा झाल्याची बातमी शूक्रवारी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. आता रोहितने पोस्ट शेअर करत अधिकृत माहिती दिली आहे.