आजच्या अंतिम सामन्यात रोहित शर्मा करू शकतो
आजच्या अंतिम सामन्यात रोहित शर्मा करू शकतो "हे" विक्रम
img
दैनिक भ्रमर

कोलंबो :- आशिया चषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना आज कोलंबो येथे प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. या सामन्यात टीम इंडियाचा जबाबदारी रोहित शर्मावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. 

भारतीय क्रिकेट संघाने अंतिम सामना जिंकल्यास आठव्यांदा विजेतेपद पटकावणार आहे. आशिया कपच्या इतिहासात भारतीय संघाने सर्वाधिक 7 वेळा विजेतेपद पटकावले आहे. भारतानं 1984, 1988, 1990/91, 1995, 2010, 2016 आणि 2018 मध्ये आशिया चषक जिंकला.

सामना खेळण्यासाठी मैदानात उतरताच रोहित रेकॉर्ड्स रचणार आहे. रोहित एकूण पाचव्यांदा आशिया चषक फायनलमध्ये खेळणार आहे. या बाबतीत रोहित शर्मा हा मोहम्मद अझरुद्दीन, महेंद्रसिंह धोनी, नवज्योतसिंह सिद्धू आणि सचिन तेंडुलकर यांना देखील मागे टाकणार आहे. हे सर्व खेळाडू प्रत्येकी चार फायनल खेळले आहेत. 

रोहित सचिन तेंडुलकरच्या विक्रमापासून केवळ 33 धावा दूर आहे. आजच्या सामन्यात जर रोहितनं 33 धावा केल्या, तर तो आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरेल. 61 धावा केल्यानंतर रोहित शर्मा आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये आपल्या एक हजार धावाही पूर्ण करेल.

आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये 1000 धावा करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय क्रिकेपटू ठरणार आहे. सचिन तेंडुलकरनं आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये 23 सामन्यांत 51.10 च्या सरासरीनं 971 धावा केल्या होत्या. रोहितने अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावल्यास तो आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा कर्णधारही ठरेल. या बाबतीत रोहित अर्जुन रणतुंगाला मागे टाकेल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group