.....म्हणून टीम इंडियाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं
.....म्हणून टीम इंडियाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं
img
Dipali Ghadwaje
भारतीय संघाला घरच्या मैदानावर तिसऱ्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी होती. मात्र ऑस्ट्रेलियाची दमदार गोलंदाजी, ट्रेविस हेड आणि मार्नस लाबुशेनच्या तुफान फटकेबाजीमुळे भारतीय संघाचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं आहे. त्यामुळे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाला वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.  

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २४० धावा केल्या होत्या. आव्हान तसं मोठं नव्हतं. मात्र भारतीय संघाने डावाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला ३ मोठे धक्के दिले.

मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहने मिळून संघाला चांगली सुरुवात करुन दिली. शमीने डेव्हिड वॉर्नरला बाद केलं. त्यानंतर बुमराहने स्टीव्ह स्मिथ आणि जसप्रीत बुमराहला बाद केलं. अवघ्या ४७ धावांवर ऑस्ट्रेलियाचे ३ फलंदाज माघारी परतले होते.

इथपर्यंत सर्व काही सुरळीत सुरु होतं. भारतीय संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता. मात्र त्यावेळी रोहित शर्माने एक मोठी चूक केली, परिणामी भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

शमी आणि बुमराह गोलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाचे फलंदाज दबावात होते. त्यानंतर रोहितने रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादवला गोलंदाजीसाठी बोलवलं. हे दोघं गोलंदाजीला आल्यानंतर हेड आणि लाबुशेन यांनी मोकळ्यापणे खेळायला सुरुवात केली. १६ व्या षटकापर्यंत संघाची धावसंख्या ३ गडी ८७ धावांवर जाऊन पोहोचली. १७ व्या रोहितने मोहम्मद सिराजला गोलंदाजी आक्रमणासाठी बोलवलं.

मात्र तोपर्यंत ऑस्ट्रेलियन फलंदाजांवरचा दबाव पूर्णपणे निघून गेला होता. सिराजने आपल्या पहिल्या षटकात १६ धावा खर्च केल्या. सिराजची ३ षटकं पूर्ण झाल्यानंतर रोहितने पुन्हा एकदा फिरकी गोलंदाजांना गोलंदाजीसाठी बोलवलं.  कुलदीपने ६ षटकात ३० धावा तर जडेजाने ४ षटकात १६ धावा खर्च केल्या होत्या.

यादरम्यान दोघांनाही एकही गडी बाद करता आला नव्हता. दोन्ही फिरकी गोलंदाज फ्लॉप ठरत असताना रोहितने एका बाजूने मोहम्मद सिराजला गोलंदाजीसाठी आणायला हवं होतं. अंस केलं असतं तर ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर दबाव बनवून ठेवता आला असता.

खेळपट्टीचा अंदाज चुकला...
हा सामना ज्या खेळपट्टीवर खेळवला गेला ती खेळपट्टी स्लो आणि कोरडी होती. ऑस्ट्रेलिायाच्या कर्णधाराने या खेळपट्टीचा अचुक अभ्यास केला आणि नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

ऑस्ट्रेलियाने हा निर्णय सार्थ ही ठरवला. दुसरीकडे रोहित शर्मा म्हणाला की, आम्ही नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार होतो. त्यामुळे कुठेतरी रोहित आणि भारतीय टीम मॅनेजमेंटचा अंदाज चुकला असं चित्र दिसतंय.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group