मोठी बातमी : बंगळुरुतील दुर्घटनेनंतर आरसीबीचा मोठा निर्णय, मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर
मोठी बातमी : बंगळुरुतील दुर्घटनेनंतर आरसीबीचा मोठा निर्णय, मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर
img
DB
बंगळुरूमध्ये बुधवारी 4 जून झालेल्या दुर्घटनेमुळे आरसीबीच्या विजयाला गाळबोट लागलं. एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत आरसीबीच्या 11 चाहत्यांचा मृत्यू झाला. 

या दुर्घटनेनंतर सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगुळुरु फ्रँचायजीने मोठा निर्णय घेतला आहे.

आरसीबी फ्रँचायजीने अकरा मृतांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. आरसीबीने मृतांच्या कुटुंबासाठी प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

तसेच मृतांच्या कुटुंबियांना मदत करता यावी, यासाठी आरसीबीकडून ‘आरसीबी केअर्स’ नावाचा एक निधी देखील तयार केला जात आहे. याबाबतची माहिती आरसीबीकडून सोशल मीडियावरुन देण्यात आली आहे.
 
cricket | RCB |
इतर बातम्या
Join Whatsapp Group