दैनिक भ्रमर : क्रिकेट म्हणजे अनेकांचा जीव की प्राण ! त्यात भारत आणि पाकिस्तान या दोन संघामध्ये मॅच असेल तर मॅच न पाहणारे देखील आवर्जून मॅच पाहण्यासाठी हजेरी लावतात. काही दिवसात म्हणजेच आशिया कपला सुरुवात होणार आहे. ज्याची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे. भारतीय संघ १४ सप्टेंबर रोजी ग्रुप ए मॅचमध्ये आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
आशिया कप 2025 चे लाईव्ह टेलीकास्ट आणि स्ट्रीमिंगचे अधिकार सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. वृत्तानुसार, आशिया कप 2025 मधील भारताच्या सामन्यांच्या जाहिरातींची किंमत 10 सेकंदांच्या स्लॉटसाठी 14 ते 16 लाख रुपये आहे.
यावेळी आशियाई स्पर्धा टी20 स्वरूपात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचा अधिकृत मीडिया राइट होल्डर असलेल्या सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया (SPNI) ने सामन्यादरम्यान जाहिराती चालवणाऱ्यांसाठी जाहिरात कार्ड दर जाहीर केले आहेत. त्यानुसार, भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान टीव्हीवर 10 सेकंदांच्या जाहिरातीसाठी तब्बल 16 लाख रुपये मोजावे लागणार आहेत.
को-प्रेजेंटिंग स्पॉन्सरशिप: 18 कोटी रुपये
असोसिएट स्पॉन्सरशिप : 13 कोटी रुपये
स्पॉट-बाय पॅकेज ( भारत आणि इतर मॅचेस): 10 सेकंदासाठी 16 लाख प्रत्येकी, किंवा 4.48 कोटी रुपये
फॉर्मॅटनुसार जाहिरातीचे दर
कनेक्टेड टीवी जाहिरीत : 450 रुपये (भारत-पाकिस्तान साठी 800 रुपये ; भारत-पाकिस्तान साठी 1,200 रुपये)
प्री-रोल्स: 275 रुपये प्रति 10 सेकंड (भारतीय सामन्यांसाठी 500 रुपये; भारत-पाकिस्तान साठी 750 रुपये )
मिड-रोल्स: 225 रुपये (भारतीय सामन्यांसाठी 400 रुपये; भारत-पाकिस्तान साठी 600 रुपये )
सोनी LIV वर डिजिटल डील्स
को-प्रेजेंटिंग आणि हायलाइट्स पार्टनर : प्रत्येकी 30 कोटी रुपये
को-पॉवर्ड-बाय पॅकेज : 18 कोटी
सर्व डिजिटल जाहिरातींपैकी 30% जाहिराती भारतातील सामन्यांसाठी राखीव आहेत.