रक्ताने माखलेला चेहरा ! उर्फीवर कोणी केला हल्ला ? चाहते चिंतेत; उर्फीने स्वतः केला खुलासा , म्हणाली...
रक्ताने माखलेला चेहरा ! उर्फीवर कोणी केला हल्ला ? चाहते चिंतेत; उर्फीने स्वतः केला खुलासा , म्हणाली...
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : उर्फी जावेद तिच्या आगळ्यावेगळ्या फॅशन आणि बोल्ड स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते, पण यावेळी उर्फीचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहते हैराण झाले आहेत. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या तिच्या फोटो आणि व्हिडिओंनी सर्वांनाच धक्का बसला आहे.

डोळ्याखालून सतत रक्त वाहत होते आणि चेहऱ्यावरील सूज देखील स्पष्ट दिसत आहे. जर दुखापत थोडी जास्त असती तर तिच्या डोळ्याला कायमचे नुकसान झाले असते. पण सर्वात मोठा प्रश्न म्हणजे उर्फीची अशी अवस्था कशी काय झाली?

Apple ने डोनाल्ड ट्रम्पना दिला मोठा झटका, घेतला 'हा' मोठा निर्णय

उर्फीचे चाहते चिंतेत असताना, अभिनेत्रीने स्वतः हे रहस्य उघड केले. उर्फीने सांगितले की ती सोफ्यावर बसली होती, तेव्हा तिची मांजर अचानक आली आणि तिला ओरबाडले. कॅप्शनमध्ये उर्फीने लिहिलंय की, "कॅट पॅरेंट्स, तुम्हाला कळेल का? मी सोफ्यावर बसले होते आणि अचानक माझ्या मांजरीनं मला (चुकून) ओरबाडलं..." म्हणजेच, उर्फीला झालेली दुखापत तिच्या मांजरीच्या नखांमुळे झाली होती, जी कदाचित खेळताना थोडी जास्तच लाडात आली आणि तिनं उर्फीला ओरबाडून काढलं.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group