भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रोहित शर्मानंतर विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे.
विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्ततीची घोषणा केली. विराट कोहली आणि रोहित शर्मा आता फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे.
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला जिवंत केले होते, त्यामुळे विराट कोहलीने आताच निवृत्ती घेऊ नये, असे अनेक चाहत्यांची भावना होती. बीसीसीआयनेही याबाबत विराट कोहलीच्या मनधरणीचा प्रयत्न केला. पण विराट कोहलीने निवृत्ती घेतली आहे. विराट आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत आगामी इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाची कसोटी लागणार आहे.
विराट कोहलीने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नेमकं काय म्हटले?
मागील १४ वर्षांपासून भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळत आहे. खरं सांगायचं तर, या फॉरमॅटमुळे माझा प्रवास कुठे जाईल याची मी कधी कल्पनाच केली नव्हती. कसोटी क्रिकेटने मला घडवलं आणि आयुष्यभर जपून ठेवावे असे धडे दिले. पांढऱ्या कपड्यांमध्ये खेळण्यात काहीतरी खूप वैयक्तिक आहे. शांतपणे मेहनत, मोठे दिवस, आणि त्या छोट्या क्षणांचा अनुभव ज्याला कोणी पाहत नाही पण त्या तुझ्यासोबत कायम राहतात. या फॉरमॅटपासून दूर जाताना मन जड आहे — पण हे योग्य वाटतं. मी माझं सर्व काही दिलं, आणि याने मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त दिलं. मी कृतज्ञतेने भरलेल्या मनाने पुढे जात आहे — या खेळासाठी, ज्यांच्यासोबत मी मैदानावर खेळलो त्या माणसांसाठी, आणि मला प्रत्येक टप्प्यावर आधार देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी.मी माझ्या टेस्ट करिअरकडे नेहमी हसतमुखाने पाहीन.