रोहित शर्मानंतर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या दोन्ही क्रिकेटपटूंच्या या निर्णयाने मात्र त्यांचे चाहते चांगलेच हताश झाले आहेत. दरम्यान, भारतीय संघ पुन्हा एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या पर्वासाठी सज्ज झाला आहे. जून महिन्यात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. असं असताना या मालिकेपूर्वीच भारतीय संघाला धक्का बसला आहे. रोहित शर्मानंतर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पण या निर्णयामुळे विराट कोहलीचं मोठं नुकसान होणार आहे.
विराट कोहलीचं कोट्यवधींचं नुकसान
टीम इंडिया या वर्षी एकूण 9 कसोटी सामने खेळणार आहे. बीसीसीआय एक कसोटी सामन्यासाठी मानधन म्हणून 15 लाख रुपये देते. जर विराट कोहली कसोटीतून निवृत्त झाला नसता तर त्याला कसोटी फॉर्मेटसाठी 1 कोटी 35 लाख रुपये मिळाले असते. टीम इंडिया सर्वप्रथम इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा 20 जूनपासून सुरु होणार आहे. तसेच 4 ऑगस्टला शेवटचा कसोटी सामना आहे. या दौऱ्यात टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात होम ग्राउंडवर वेस्ट इंडिजशी दोन सामन्यांची कसोटी मालिका, त्यानंतर नोव्हेंबरमध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. म्हणजेत या तीन मालिकेत 9 कसोटी सामने खेळणार आहे.
.