मुंबई : महादेव ऑनलाईन गेमिंग ॲप प्रकरणी आता एक नवी माहिती समोर आली असून, युएईमध्ये झालेल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन व सक्सेस पार्टीमध्ये सहभागी झालेल्या बॉलिवूडमधील संजय दत्त, सुनील शेट्टी यांच्यासह 34 कलाकार ईडीच्या रडारवर आले आहे.
यूएईमध्ये झालेल्या पार्टीत एक युट्यूब इन्फ्लुएंसर सहभागी झाला होता. त्याने आपल्या युट्यूब चॅनलवरुन एक व्हिडीओ शेअर केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि अनेक कलाकार ईडीच्या रडारवर आले. या व्हिडीओमध्ये सौरभ चंद्राकरच्या लग्नापासून ते बर्थडे पार्टी आणि सक्सेस पार्टीची झलक पाहायला मिळत आहेत. तसेच या पार्टीमध्ये सहभागी झालेले कलाकारही दिसत आहेत. सौरभ चंद्राकर या आरोपीने आपल्या लग्नासाठी 200 कोटी रुपये तर बर्थडे व सक्सेस पार्टीसाठी 60 करोड रुपये खर्च केल्याचे तपासात समोर येत आहे.
रफ्तार, दीप्ती साधवानी, सुनील शेट्टी, सोनू सूद, संजय दत्त्, हार्डी संधू, सुनील ग्रोव्हर, सोनाक्षी सिन्हा, रश्मिका मानधना, सारा अली खान, गुरु रंधावा, सुखविंदर सिंग, टायगर श्रॉफ, कपिल शर्मा, नुसरत बरुचा, डीजे चेतस, मलायका अरोरा, नोरा फतेही, अमित त्रिवेदी, मौनी रॉय, आफताब शिवदासानी, सोफी चौधरी, डेझी शाह, उर्वशी रौतेला, नर्गिस फाखरी, नेहा शर्मा, इशिता राज, शमिता शेट्टी, प्रीती झांगियानी, स्नेहा उल्लाल, सोनाली सहगल, इशिता दत्ता, एलनाझ, ज्योर्जिओ ॲड्रियानीमहादेव बुक ॲपची जाहिरात आणि प्रमोशन करणाऱ्या या सर्व कलाकार आणि गायकांना मोठी रक्कम देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सौरभ चंद्राकरच्या लग्नाला हजेरी लावणारे आणि वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झालेले आणि परफॉर्म करणारे सेलिब्रिटीच नाही तर महादेव बुक ॲपची जाहिरात आणि प्रमोशन करणारे बॉलिवूडकर ईडीच्या रडारवर आले आहेत.
महादेव बुक ॲपचा मालक सौरभ चंद्राकरने त्याच्या लग्नात 200 कोटी रुपयांचा खर्च केला होता. 200 कोटी रुपये उधळल्यामुळे तो चर्चेत आला. ईडी आता या प्रकरणील मनी लॉन्ड्रींगचा तपास करत असून सौरभच्या लग्नामध्ये जे बॉलीवूड अभिनेते, अभिनेत्री व गायक उपस्थित होते व त्याचबरोबर काही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांनी महादेव बुक अँपचा प्रचार केला होता त्यांनाही ईडीही आता चौकशीसाठी बोलवणार असल्याचे समजते.