बॉलिवूडमधून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. ड्रग्ज आणि फिल्म इंडस्ट्रीचे कलेक्शन बरेचदा दिसून आले आहे. त्याबाबत अनेकांना शिक्षासुद्धा झाली आहे. सोमवारी, अशाच एका बॉलिवूड सहाय्यक अभिनेत्याला ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.चेन्नई कस्टम्स आणि महसूल गुप्तचर संचालनालयाने संयुक्तपणे ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, कस्टम्सच्या गुप्तचर युनिटने सिंगापूरहून चेन्नईला पोहोचलेल्या बॉलिवूड अभिनेत्याला चेन्नई विमानतळावर अटक केली. अभिनेत्याने चेक-इन केल्यानंतर त्याच्या सामानाची तपासणी करण्यात आली. अधिकाऱ्यांना त्याच्या ट्रॉलीच्या तळाशी लपवून ठेवलेले पांढऱ्या रंगाच्या पावडरचे प्लास्टिकचे पाउच सापडले.फील्ड ड्रग्स टेट्स केल्यानंतर अभिनेत्याकडून जप्त करण्यात आलेली पावडर ही कोकेन असल्याची स्पष्ट झाले. त्यानंतर अभिनेत्याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान, हा बॉलिवूड अभिनेता कंबोडियाहून सिंगापूरमार्गे चेन्नईला गेला होता ही माहिती समोर आली. अज्ञात व्यक्तींनी त्याला कंबोडियात ट्रॉली चेन्नई विमानतळावर रिसीव्हरला देण्यासाठी दिली होती, असा दावा अभिनेत्याने केला आहे. तो मुंबई किंवा दिल्लीतील कार्टेलसाठी हे अंमली पदार्थ घेऊन जात होता असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नुकत्याच अटक करण्यात आलेल्या अभिनेत्याचे नाव जरी समोर आले नसले तरी त्याची कसून चौकशी केली जात आहे.