छावा सिनेमाच्या शूटींगदरम्यान विकी कौशलला अपघात
छावा सिनेमाच्या शूटींगदरम्यान विकी कौशलला अपघात
img
Dipali Ghadwaje
प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलला सेटवर शूटिंगदरम्यान दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. विकी कौशलकडे अनेक मोठ्या सिनेमांची ऑफर आहे. त्याच्या छावा या सिनेमाचे शूटींग देखील सुरु आहे. छावाच्या शूटींग दरम्यान विकी कौशल जखमी झाला असून त्याच्या हाताला प्लास्टर लावण्यात आले आहे. 'जरा हटके जरा बचके' या सिनेमानंतर विकी कौशलने पुन्हा लक्ष्मण उतेकरसोबत काम केले आहे. दुर्दैवाने याच सेटवर तो जखमी झाला आहे.

विकी कौशलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये विकीच्या हाताला प्लास्टर लावण्यात आला असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये विकी त्याच्या कारमधून बाहेर पडत घराकडे जात आहे. विकी पुढील काही आठवडे आराम करणार असल्याचे बोलले जात आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर तो पुन्हा एकदा शूटींग सुरु करेन. विकीचा जखमी अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहते चिंतेत पडले आहेत.

विकी कौशल संभाजी महाराजांच्या भूमिकेत 
अभिनेता विकी कौशल 'छावा' या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या सिनेमात अभिनेत्री रश्मिका मंदाना येसूबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात औरंगजेबाची भूमिकाही महत्वाची असणार आहे. त्यामुळे औरंगजेबाच्या भूमिकेवर जोर देण्यात आलाय. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group