बॉलिवूडचं स्टार कपल विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालंय. जोडप्यानं आपल्या बाळाचं स्वागत केलंय. वयाच्या ४२ व्या वर्षी कतरिना कैफनं मुलाला जन्म दिला आहे. विक्की कौशलनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन गूड न्यूज शेअर केली आहे.
कतरिना आणि विकी आई-बाबा बनले आहेत. अभिनेत्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून ही गुड न्यूज शेअर करण्यात आली आहे. चाहते प्रचंड आनंदले असून त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
विकी आणि कतरिना यांनी त्यांच्या मुलाचे जगात स्वागत करताना एक संयुक्त पोस्ट शेअर केली. “आमच्या घरी आनंदाचं गाठोडं आलं आहे. खूप आनंद आणि उत्साहाने आम्ही आमच्या मुलाचं स्वागत करतो – कतरिना आणि विकी.. ” असं लिहीलेली पोस्ट त्यांनी शेअर केली. Blessed अशी कॅप्शनही याोबत लिहीली आहे.