बॉलिवूडमधील सुपरस्टार कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच आई-बाबा होणार आहेत. कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी डिसेंबर २०२१ मध्ये लग्न केले आणि आता ते त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी तयार आहेत. कतरिना कैफने अखेर तिच्या गरोदरपणाची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर एक क्यूट फोटो पोस्ट करत कतरिना आणि विकी यांनी त्यांच्या बाळाच्या आगमनाची घोषणा केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याच्या बातम्या व्हायरल होत होत्या. बेबी बम्पसह कतरिनाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे कतरिना गर्भवती असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर कतरिनाने चाहत्यांसोबत ही गुड न्यूज शेअर केली आहे. ही बातमी ऐकताच चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. गुड न्यूज देताना कतरिनाने तिचा बेबी बम्प असलेला एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो कतरिना आणि विकी दोघांनी हातात पकडल्याचं दिसून येत आहे. हा फोटो पाहून चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे.
इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो शेअर करताना कतरिनाने लिहिलं, आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय सुरू करण्याच्या मार्गावर आहोत.
कतरिनाची प्रेग्नन्सीची बातमी समोर आल्यानंतर आता तिची डिलिव्हरी कधी असेल याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. काहींच्या मते ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात कतरिना बाळाला जन्म देऊ शकते. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.