रणबीर कपूर, कतरिना कैफ यांचं ब्रेकअप का झालं होतं ? अखेर खरं कारण समोर ?
रणबीर कपूर, कतरिना कैफ यांचं ब्रेकअप का झालं होतं ? अखेर खरं कारण समोर ?
img
वैष्णवी सांगळे
अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचं नातं त्यावेळेस बॉलिवूडमध्ये चांगलच चर्चेत होतं. दोघे लग्न देखील करणार असल्याची चर्चा होती मात्र दोघांचं  'ब्रेक-अप' झालं. या दोघांचं ब्रेक-अप नेमकं का झालं याविषयी दोघांनीही नेहमीच बोलणं टाळलं. 

दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांनी दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2021 मध्ये लग्न केलं आणि 2025 मध्ये ते एका मुलाचे पालक झाले.पाच वर्ष डेटिंग केल्यानंतर 2022 मध्ये रणबीरनं आलिया भट्टशी लग्न केलं आणि आता ते एका मुलीचे पालक आहेत.

मात्र रणबीर कपूर आणि कतरिना कैफ याच्या नात्याबद्दल खरं कारण काय याची चर्चा आजही रंगते. त्यांचा ब्रेकअप चाहत्यांसाठी एक धक्काच होता. कधीकाळी रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यात अफाट प्रेम होतं. दरम्यान, त्यांच्या ब्रेकअपमुळे सर्वांना धक्का बसला. आजही त्यांच्या लव्हस्टोरीची आणि ब्रेकअपची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली असते.

रणबीर कपूरसोबत अनेक अभिनेत्रींची नावं जोडली गेली. रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोनच्या रिलेशनशिपचीही मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली. पण, दोघांमध्ये कतरिना आली आणि दोघांचा ब्रेकअप झाला, असं सांगितलं जातं.

कतरिना कैफ आणि रणबीर कपूर 'अजब प्रेम की गजब कहानी' सिनेमाच्या सेटवर भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. चाहत्यांना दोघांची जोडी खूप आवडली आणि अनेकांनी तर दोघांच्या लग्नाची स्वप्नही पाहिली. पण कदाचित नशिबानं त्यांच्यासाठी वेगळंच नियोजन केलेलं. दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आणि चाहत्यांनी पाहिलेली दोघांच्या लग्नाची स्वप्न धुळीला मिळाली.

त्यांच्या ब्रेकअपचं आणखी एक कारण सांगितलं जातं, ते म्हणजे, रणबीरची आई नितू सिंह यांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता.एक दिवस, जेव्हा रणबीर आणि कतरिना कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस सेलिब्रेशनला पोहोचले, तेव्हा नितू कपूर इतक्या रागावल्या की, त्या समारंभातून निघून गेल्या. असंही म्हटलं जातं की, कुटुंबाची नाराजी त्यांच्या ब्रेकअपचं कारण असू शकतं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group