आत्मसमर्पण करण्यापूर्वी अभिनेता राजपाल यादव झाला भावूक, म्हणाला, मी काय करु? माझ्याकडे...
आत्मसमर्पण करण्यापूर्वी अभिनेता राजपाल यादव झाला भावूक, म्हणाला, मी काय करु? माझ्याकडे...
img
वैष्णवी सांगळे
बॉलीवूड मधील विनोदी अभिनेता राजपाल यादव सध्या अडचणीत सापडला आहे. अलिकडेच चेक बाउन्स प्रकरणात राजपाल यादव याने तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले. राजपाल यादवने आत्मसमर्पण करण्यापूर्वी भावूक झाला होता. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजपाल यादव आत्मसमर्पण करण्यापूर्वी खूप दुःखी आणि भावनिक झाला होता. न्यूजएक्सला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "मी काय करु? माझ्याकडे पैसे नाहीत. मला दुसरा कोणताही मार्ग दिसत नाही. आपण सर्व येथे एकटे आहोत. माझे कोणतेही मित्र नाहीत. मला या समस्येला एकट्याने तोंड द्यावे लागेल.

नेमकं प्रकरण काय ? 
राजपाल यादवने मेसर्स मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून अंदाजे ५ कोटी कर्ज घेतले होते. कंपनीचा दावा आहे की त्याने पैसे परत करण्यासाठी अनेक चेक दिले होते, परंतु ते सर्व बाउन्स झाले. कंपनीने (मेसर्स मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड) राजपाल यादवविरुद्ध चेक बाउन्सचा खटला दाखल केला. हे चेक चित्रपट निर्मितीसाठी देण्यात आले होते. परंतु पैसे मिळाले नाहीत.

कनिष्ठ न्यायालयाने राजपाल यादवला दोषी ठरवले आणि त्याला ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयाने यापूर्वी त्याची शिक्षा स्थगित केली होती, परंतु तो कंपनीला परतफेड करेल अशी अट घातली होती. न्यायालयाला वारंवार आश्वासने देऊनही, राजपाल यादवने वारंवार परतफेड केली नाही. 

२ फेब्रुवारी रोजी राजपाल यादवला आत्मसमर्पण करण्याचा आदेश देण्यात आला. अभिनेत्याच्या वकिलाने न्यायालयाला माहिती दिली की त्याने ५० लाख रुपयांची व्यवस्था केली आहे आणि पैसे भरण्यासाठी एका आठवड्याची वेळ मागितली आहे. पण, न्यायमूर्ती स्वरण कांता शर्मा यांनी राजपाल यादवची आत्मसमर्पण करण्याची मुदत वाढवण्याची विनंती फेटाळून लावली. त्यानंतर अभिनेत्याने गेल्या गुरुवारी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group