बॉलिवूडल अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनालीचा मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ती जखमी झाली आहे. पण अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सोनालीवर सध्या नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुर आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली तिच्या बहिण आणि भाच्यासोबत गाडीतून मुंबई- नागपूर हायवेवरून प्रवास करत होती. ही घटना सोमवारी रात्री घडली आहे.
या भीषण अपघातामध्ये सोनाली जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तिचा भाचा देखील जखमी झाला आहे. दोघांवरही नागपूरमधील रुग्णलयात उपचार सुरु आहेत.