मुंबई : बॉलिवूडमधून एक धक्कादयक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री सुहानी भटनागर हिचं निधन झालं आहे वयाच्या 19 व्या वर्षा सुहानी भटनागर हिने अखेरचा श्वास घेतला आहे. सुहानी भटनागर हिने ‘दंगल’ सिनेमात अभिनेता आमिर खान याच्या लेकीची भूमिका साकारली होती. सुहानी हिच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे.
अपघातानंतर अभिनेत्रीचं निधन झाल्याची माहिती समोर येत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुहानी भटनागर हिच्या निधनाची चर्चा सुरु आहे. फरिदाबाद येथील रहिवासी असलेल्या सुहानी भटनागरच्या मृत्यूचे कारण अत्यंत धक्कादायक आहे. अभिनेत्रीच्या संपूर्ण शरीरात पाणी भरल्यामुळे सुहानी हिचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वी सुहानीचा अपघात झाला होता, त्यामुळे तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. सुहानीने उपचारासाठी घेतलेल्या औषधांचे असे दुष्परिणाम झाले की तिच्या शरीरात हळूहळू पाणी साचू लागलं. सुहानी हिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल देखील करण्यात आलं होतं. पण उपचारा दरम्यान अभिनेत्रीचं निधन झालं.
सुहानी भटनागर ही बॉलिवूडची प्रसिद्ध बालकलाकार होती. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या आमिर खान स्टारर ‘दंगल’ सिनेमातून सुहानी हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सिनेमानंतर सुहानी हिला अनेक जाहिरातींमध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली.