जया बच्चन यांना लग्नाचा पश्चात्ताप ? म्हणाल्या नात 'नव्या' हिने लग्नच करू नये , कारण...
जया बच्चन यांना लग्नाचा पश्चात्ताप ? म्हणाल्या नात 'नव्या' हिने लग्नच करू नये , कारण...
img
वैष्णवी सांगळे
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी नेहमीच चर्चेत असतात. अलीकडेच एका कार्यक्रमात त्यांनी लग्नाबद्दल आपलं मत मोकळेपणाने मांडले. यावेळी लग्नाची संकल्पना 'आऊटडेटेड' झाली असल्याचे मत व्यक्त केले.

जया बच्चन 'वी द वुमन'च्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या, जिथे त्यांनी सांगितले की, त्यांना त्यांची नात नव्या नवेली नंदा हिने लग्न करू नये असे वाटते. नव्या नवेली नंदा 28 वर्षांची होणार आहे. यावेळी त्यांनी लग्नाची तुलना 'दिल्लीचा लाडू' या म्हणीशी केली. त्या म्हणाल्या, "लग्नाचा लाडू खाल्ला तर अडचणीत फसणार आणि नाही खाल्ला तर पश्चाताप होणार. असं त्या म्हणाल्या. 

लोक कदाचित माझ्या बोलण्यावर आक्षेप घेतील, पण शारीरिक आकर्षण आणि अनुकूलता खूप महत्त्वाची आहे. आम्ही आमच्या काळात हे करून पाहू शकलो नाही, पण आजकालची पिढी हे करू शकते आणि त्यांनी का करू नये? दीर्घकाळ नातेसंबंध टिकवण्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे."

नव्याने लग्नानंतर करिअर सोडावे का, या प्रश्नावर जया बच्चन यांनी 'नाही' असं उत्तर दिले. त्या म्हणाल्या, माझी इच्छा नाही की नव्याने लग्न करावं. आजकालची मुले कोणालाही 'आऊटस्मार्ट' करू शकतात. आजकालची मुले खूप हुशार आहेत आणि अनेक गोष्टी आधीच शिकून येत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group