माझ्या जीवाला धोका असूनही...'; सलमानच्या घरावरील गोळीबारानंतर घोसाळकरांच्या पत्नीची उद्विग्न पोस्ट
माझ्या जीवाला धोका असूनही...'; सलमानच्या घरावरील गोळीबारानंतर घोसाळकरांच्या पत्नीची उद्विग्न पोस्ट
img
Dipali Ghadwaje
बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर रविवारी पहाटेच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. वांद्रयातील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या समोर दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी सलमान खानच्या घराच्या दिशेने 6 गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी सलमानच्या घराजवळ असलेल्या गॅलरीला लागली असून या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स विश्नोईच्या भावाने घेतली आहे. 

दरम्यान या घटनेनंतर विविध नेते आणि सेलिब्रिटिंनी सलमान खानची भेट घेतली. तर दुसरीकडे  गोळीबारानंतर मुंबई पोलीसांनी वेगाने तपास चक्रे फिरवण्यास सुरूवात केली आहे. अशातच सलमान खानच्या हत्येनंतर तत्परता दाखवणारी मुंबई पोलीस अभिषेक घोसाळकर प्रकरणाचा तपास का करत नाही, असा सवाल करत तेजस्वी घोसाळकर यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांची फेसबूक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
 
काय म्हणाल्यात तेजस्वी घोसाळकर?

"सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यानंतर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीजकडून त्वरीत कारवाई करण्यात आली. या हाय-प्रोफाइल घटनेवर तात्काळ लक्ष केंद्रित केले जाते. मात्र निष्काळजीपणाचे, त्रासदायक प्रकरण म्हणजे माझे पती अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा न झालेला उलगडा.

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर धोका असताना पोलिसांनी माझ्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे ही त्याहून चिंताजनक बाब आहे. जर सिस्टीम एखाद्या सेलिब्रिटीची सुरक्षा मजबूत करण्यासाठी रॅली काढू शकते तर मला सलमान खानसारखे संरक्षण का दिले गेले नाही. कारवाईवरील विसंगती आपल्या न्याय व्यवस्थेच्या निष्पक्षता आणि परिणामकारकतेबद्दल चिंता निर्माण करते. सामाजिक स्थिती किंवा सेलिब्रिटी असा विचार न करता सुरक्षिततेला प्राधान्य देणे महत्वाचे आहे," असे तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटले आहे.
 
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबूक लाईव्ह दरम्यान गोळ्या झाडून निर्घुण हत्या करण्यात आली होती. या भयंकर घटनेने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. याच प्रकरणावरुन तेजस्वी घोसाळकर यांनी राज्य सरकार तसेच तपास यंत्रणांवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group