बीड : बीड लोकसभा निवडणुकीचे लाईव्ह वार्तांकन करण्यासाठी मुबंई येथून अंबाजोगाई शहरात आलेले 'आज तक'चे पत्रकार वैभव कनगुटकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज पहाटे दुःखद निधन झाले..
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान आज सुरू आहे. देशातील ९६ लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू असून यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांचा समावेश आहे. बीड लोकसभा मतदारसंघात लाईव्ह वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकाराचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडलीय.
मुंबईतून बीडमध्ये आज तक चे पत्रका वैभव कनगुटकर हे वार्तांकनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पत्रकार वैभव विजय कनगुटकर हे मुंबईतून बीड लोकसभा मतदारसंघात वार्तांकनासाठी गेले होते. तिथं लाइव्ह रिपोर्टिंग झाल्यानंतर त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. ४८ वर्षीय वैभव कनगुटकर यांचं बीडच्या अंबाजोगाईत वार्तांकन सुरू होतं. वैभव यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.